शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

 मनुष्य मन माणुसकी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शैलेश राणे यांच्या संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.

https://youtu.be/JQe-zuL5lNc

श्री शैलेश राणे यांचा भर शाळेतील मुलांच्या शैक्षणिक त्याचप्रमाणे इतर गुणांच्या वाढीस वाव देण्यावर असतो. शैलेश राणे यांच्या कल्पनेतून नानाविध स्पर्धा परीक्षा चे आयोजन संस्थेतर्फे केले गेले आहे. शालेय विद्यार्थी विशेष करून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शैलेश राणे कल्पकतेने विविध क्लृप्त्या वापरून मुलांना त्यात सामील करून घेतात.

Anniversary wishes to Manushya Man Manuski from our hon Vice President Mr. Shailesh Rane. He has expressed her feelings about Manushya Man Manuski Social Group in the video. He's been with group almost since formation. He is more into Children Development and their skills. Be it sports, or education, or their Writing and Speech. He has dedicated himself into it. You can also be part our Manushya Man Manuski social group.

For details, Please contact: Mr. Vijay Deshmukh +91 9920331599 / +91 8169719992
आमच्या फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्राम पेज ला जरूर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा.
.
.
.
.

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

प्रेम_हे

माझा एक जवळचा खूप चांगला मित्र आहे.लग्नानंतर सात आठ वर्षे झाली तरी तो आपल्या बायकोला अजून ही नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रियकरा सारखा बाहेर भेटत असतो.जाताना आई-वडिलांना समजू नये म्हणून दोघे ही वेगळ्या वेगळ्या टाईमला घरी पोहचतात.त्याने सांगितलेली एक गोष्ट मला खूप आवडली कि ती म्हणजे "तुझ्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी येतील पण तुझी सर्वात खास मैत्रीण हि तुझी बायकोच राहील.बाकी प्रत्येकजण आपल्या आपल्या वेळ आणि गरजेनुसार तुला साथ देतील पण तुझी बायको मात्र शेवट प्रयन्त तुला साथ देत राहील आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाशी इमोशनल attachment ठेवून मग कधी ते तुझ्या मनासारखे नाही वागलेे म्हणून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही.बायकोवर असलेले प्रेम दाखवण्यासाठी Valentine डे किंवा लग्नाचा किंवा तिचा वाढदिवस फक्त असण्याची हि गरज नाही.खरं तर रोजच नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेयसी सारखं किंवा खूप खास मैत्रीण असल्यासारखं भेटत राहिलास तर तुला प्रेमा साठी 365 दिवस सुद्धा कमी पडतील.एन्जॉय करत जा ते फिलिंग..मस्त वाटेल" #प्रेम_हे©शैलेश राणे

बुधवार, २१ जून, २०१७

बालपणीचे ती आणि तो

बालपणीचे ती आणि तो
नेहमीच्या कट्टयावर
ती:- कशी वाटली कविता.
तो:- उंम्म्म...व्हेरी गूढ..व्हेरी गूढ
ती:-तुला व्हेरी गुड बोलायचे आहे का?
तो:- हो..हो..तेच ते
ती:- मस्करी करतोस का तू माझी
तो:-नाही ग...खरं सांगू नाही समजली तुझी कविता मला.मला तर शाळेतल्या कविता पण समजत नाही.
ती:-कडूच आहेस तू..निदान खोटं खोटं तरी सांगायचं की चांगली आहे कविता .
तो:-कडू पण एक चवच असत बरं.
ती:-हो काय, थांब संध्याकाळी कारल्याची भाजी पाठवते घरी तुझ्या.
तो:-अगं कशाला कशाला.😢

मंगळवार, २० जून, २०१७

शहरी वर्ग vs.शेतकरी वर्ग

शहरी मित्र (तावातावाने ) - अरे तद्दन मूर्खपणा आहे हा... दूध आणि भाजीपाल्याची नासाडी करण्यापेक्षा गरिबांना वाटा,
शेतकरी मित्र (त्याला उत्तर देत) - म्हणजे तुम्हाला फुकट द्यायचं ना... भाजी घेताना ५-५ रुपयांसाठी घासाघीस करता तुम्ही पण तेच मल्टिप्लेक्स मध्ये ५ रुपयाचा पॉपकॉर्न ५० रुपयापासून १२० रुपयांपर्यंत घेता. जर योग्य भाव आमच्या मेहनतीला आम्हाला मिळाला असता नेहमी तर आम्ही असं कशाला केलं असते.
शहरी मित्र (पुन्हा तावातावाने)- अरे पण असं फुकट किती दिवस....सर्वच फुकट पाहिजे तुम्हाला
शेतकरी मित्र (पुन्हा तसच उत्तर) - तुम्ही नाही का घेत. तुमची ऐपत असताना सोडली होती का गॅस सबसीडी, कर बुडवायला कसली बसली खोटी बिले गोळा करत फिरत असतात आणि तुम्ही आम्हाला फुकटे म्हणतात. तुम्हाला एसी मध्ये बसून वर्षला चांगली पगारवाढ नाही मिळाली कसा राग येतो मग कंपनी लॉस मध्ये का असू दे. आमच्यासारखा उन्हात घाम काम करून बघा आणि आमच्या कष्टाला तसा योग्य मोबदला दिला नाही मिळाला तर काय करणार मग आम्ही शेवटी...

अशी दोन टोकाची मते गेले काही दिवस वाचून एवढच म्हणू शकतो कि ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाकी भाजीपाला, दूध, अन इतर धनधान्य विकत घेताना भावाबाबत उगीच घासाघीस न करणे अन अडचणीत असलेल्या संपकरी वर्गास टोमणे मारून त्रस्त न करणे इतकंच सध्या तरी मी करू शकतो .
बाकी सर्व हुशार आहेत...

बालपणीचे तो आणि ती

बालपणीचे तो आणि ती
(तो समुद्र किनारी कट्टयावर बसून समुद्राकडे एकटक बघत असताना ती येते)
ती:- तू इथं आहेस तर,घरी नव्हतास तू आणि मला पण बोलवायला आला नाहीस तेव्हा वाटलं तू इथंच असशील.काय झालं गप्प का?
तो: काही नाही असंच
ती: अरे डोळ्यात पाणी आहे तुझ्या... काय झालं?
तो- आईची आठवण आली
ती:-एकच महिना तर आहे,शाळा सूरु झाली की तू जाशील परत आई कडे.
तो: अगं माझे सर्व मित्र तिकडे आणि एकडे सगळी मोठी मुल. कोणी माझ्याशी खेळत नाही.
ती:पण मी खेळते ना तुझ्या बरोबर,तुझ्या बरोबर खेळता येईल म्हणून मी नेहमी सुट्टीची वाट बघत बसते
तो:हो...मी पण तुझ्या मुळेच येतो इकडे
ती:खेळायला येतोस का मग?
तो:-नको तू जा मला असच बसू दे थोडावेळ
ती:वेडाच आहेस. मी तुला शोधत कशाला आली असती मग.
तो:म्हणजे?
ती:म्हणजे वाघाचे पंजे,कुत्राचे कान आणि उंटाची मान
तो:(हसतो)
ती:छान हसतोस तू
तो:मग बस तू पण माझ्या सोबत
ती:हो..तुला समुद्र खूप आवडतो ना?
तो:हो खूप..वाटत असच बघत राहावं.
ती:मला पण..
(दोघहीे मग समुद्राकडे बघत राहतात.ती बोलत राहते,तो ऐकत राहतो.)
#तो_आणि_ती

बुधवार, १० मे, २०१७

मराठी मिडीयम-इंग्लिश मिडीयम

आज भारत जागतिक पातळीवर प्रचंड मोठ्या ताकदीने इतर देशाशी स्पर्धा करत आहे.त्यासाठी इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज बनत आहे. यामुळे बहुसंख्य पालक आपल्या मुलाना इंग्रजी शाळेत घालत आहेत आणि याच गोष्टीचा फायदा उठवून गेल्या काही वर्षात इंग्लिश मिडीयम शाळेची संख्या वाढली आहे.त्यात बाजारीकरण वाढले आहे.आज इंग्लिश मिडीयम मध्ये शिकण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे.परिणामी इच्छा असून ही गरीब पालकांना आपल्या मुलाना मराठी मिडीयम मध्ये शिकवावे लागत आहे.खरं म्हणजे सर्वांना समान पद्धतीचे शिक्षण देऊन गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी करता आली असती पण शिक्षणात होत असलेला वाढत राजकीय हस्तक्षेेप आणि त्यात असलेले अर्थकारण यामुळे सर्वांगीण शिक्षण हाच मूळ मुद्दा खरं तर मागे राहिला आहे.आज मराठी मिडीयम मध्ये शिकणारी बरीच हुशार मुले आहेत पण निव्वळ भाषेच्या अडथळ्यामुळे कॉलेज मध्ये आणि नंतर पदवी मिळून नोकरी मिळवताना मागे पडलेली दिसतात.कारण कॉलेज मध्ये शिक्षण हे मुखत्ववे इंग्लिश मध्ये दिले जाते आणि ते समजणे मराठी मिडीयम मधील मुलांना सुरवातीला कठीण जाते आणि जो पर्यंत समजू लागते तो प्रयन्त पदवी मिळालेली असते.नोकरी मिळवताना सुरवातीला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाते.पूर्वी मराठी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड होती त्यामुळं इंग्रजी ही भाषेची अडचण कधी वाटली नाही पण आता मात्र ती जास्त प्रमाणात जाणवू लागली आहे.समान शिक्षण पद्दत हाच त्यावर एकमेव उपाय आहे. इंग्रजी ही काळाची गरज असेल तर तीच त्याच पद्दतीने मराठी मिडीयम मधील मुलाना शिकवली गेली पाहिजे जशी ती इंग्रजी मिडीयम मधील मुलांना शिकवली जाते.मुळात इंग्लिश आणि मराठी मिडीयम हा प्रकारचं असू नयेे.प्राथमिक शिक्षण देताना मुळात असा भेदभाव करायची गरजच काय?.सध्या अभ्यासक्रमात असलेल्या त्रुटी दूर करून सध्याच्या काळातील गरज ओळखून आहे सर्वाना समान शिक्षण दिले गेले पाहिजे@ शैलेश राणे

मंगळवार, ९ मे, २०१७

तो आणि ती

तो सुट्टीत मामाच्या घरी आलेला असताना
मामा:- अरे तुझी मैत्रीण आली आहे?तुला बोलवते आहे खाली..
तो:- पण सकाळी भांडण केले तिने, आता का आली?
ती:- अरे मी सॉरी बोलते आहे ना, खाली येतोस का आधी
(खाली आल्यावर)
तो:- हा बोल आता
ती :- आई ने घावणे केले आहे, तुला बोलवलय
तो:- म्हणजे आईने बोलवले म्हणून तू आलीस
 ती :- मीच सांगितले तिला, तुला आवडतात म्हणून
तो :- का ?
ती :- आता का?, अरे सकाळी भांडण झालं होत ना आपलं मग
तो :- हीहीही... समजलं
ती :- हुशार आहेस तू, फक्त भांडखोर आहेस.
तो :- तूच आहेस,आई बोलते "जो बोलतो तोच असतो"
ती :- हो काय..आता आई घावणे खायला बोलते आहे, गपचूप खा.

(दोघे ही खळखळून हसतात )
तो आणि ती 
बालपणीच्या आठवणी