बुधवार, १० मे, २०१७

मराठी मिडीयम-इंग्लिश मिडीयम

आज भारत जागतिक पातळीवर प्रचंड मोठ्या ताकदीने इतर देशाशी स्पर्धा करत आहे.त्यासाठी इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज बनत आहे. यामुळे बहुसंख्य पालक आपल्या मुलाना इंग्रजी शाळेत घालत आहेत आणि याच गोष्टीचा फायदा उठवून गेल्या काही वर्षात इंग्लिश मिडीयम शाळेची संख्या वाढली आहे.त्यात बाजारीकरण वाढले आहे.आज इंग्लिश मिडीयम मध्ये शिकण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे.परिणामी इच्छा असून ही गरीब पालकांना आपल्या मुलाना मराठी मिडीयम मध्ये शिकवावे लागत आहे.खरं म्हणजे सर्वांना समान पद्धतीचे शिक्षण देऊन गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी करता आली असती पण शिक्षणात होत असलेला वाढत राजकीय हस्तक्षेेप आणि त्यात असलेले अर्थकारण यामुळे सर्वांगीण शिक्षण हाच मूळ मुद्दा खरं तर मागे राहिला आहे.आज मराठी मिडीयम मध्ये शिकणारी बरीच हुशार मुले आहेत पण निव्वळ भाषेच्या अडथळ्यामुळे कॉलेज मध्ये आणि नंतर पदवी मिळून नोकरी मिळवताना मागे पडलेली दिसतात.कारण कॉलेज मध्ये शिक्षण हे मुखत्ववे इंग्लिश मध्ये दिले जाते आणि ते समजणे मराठी मिडीयम मधील मुलांना सुरवातीला कठीण जाते आणि जो पर्यंत समजू लागते तो प्रयन्त पदवी मिळालेली असते.नोकरी मिळवताना सुरवातीला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाते.पूर्वी मराठी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड होती त्यामुळं इंग्रजी ही भाषेची अडचण कधी वाटली नाही पण आता मात्र ती जास्त प्रमाणात जाणवू लागली आहे.समान शिक्षण पद्दत हाच त्यावर एकमेव उपाय आहे. इंग्रजी ही काळाची गरज असेल तर तीच त्याच पद्दतीने मराठी मिडीयम मधील मुलाना शिकवली गेली पाहिजे जशी ती इंग्रजी मिडीयम मधील मुलांना शिकवली जाते.मुळात इंग्लिश आणि मराठी मिडीयम हा प्रकारचं असू नयेे.प्राथमिक शिक्षण देताना मुळात असा भेदभाव करायची गरजच काय?.सध्या अभ्यासक्रमात असलेल्या त्रुटी दूर करून सध्याच्या काळातील गरज ओळखून आहे सर्वाना समान शिक्षण दिले गेले पाहिजे@ शैलेश राणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: