मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

अभिजात मराठी

दोन एक दिवसापूर्वी म.टा. मध्ये बातमी वाचली कि कल्याणचे आचार्य अत्रे नाट्यगृह बंद होऊन तिथे मॉल होणार आहे. अश्या प्रकारे नाट्यगृहे बंद करण्याऐवजी महाराष्ट्रातील अशी सर्वच नाट्यगृह मराठी सांस्कृतिक केंद्रे कशी बनतील यासाठी प्रयन्त केले पाहिजे.जर असे झाले तर तुम्हाला मराठी चित्रपट, मराठी नाटक आणि मराठी संगीताचे कार्यक्रम अश्या एका ठिकाणी पाहायला मिळू शकतील. तिघांसाठी (नाटक/सिनेमा/वाद्यवृंद) स्वतंत्र छोटेखानी तीन थिएटर्स असतील. रसिकांना एकाच वेळी मनोरंजनाचे तीन पर्याय उपलब्ध असतील.ज्यांना मराठी संगीताची आवड आहे,त्यांना संगीताच्या सिडीज विकत घेता येईल अशी जागा तिथे असेल. ज्यांना मराठी पुस्तकाची आवड आहे, त्याच्यासाठी नवीन जुनी मराठी पुस्तके वाचायला आणि विकत घ्यायला दर्जेदार वाचनालय सुद्धा तिथे असेल. दर शनिवार/रविवार आणि सुट्टीच्या दिवशी छोटी छोटी नाटुकली संध्याकाळी त्या परिसरात सादर होतील आणि फिरायला येणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाईल. खऱ्या अर्थाने मराठीला अभिजात दर्जा मिळून देण्यासाठी सरकारने तसेच मराठी जनतेने मिळून अश्या प्रकारे प्रयन्त केले पाहिजे.#मराठीदिन #मायमराठी #अभिजातमराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: