बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

मराठी शाळा

८० च्या दशकात जेव्हा मी मराठी शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा एका वर्गात ४० ते ५० मुले असायची आणि एका इयत्तेच्या ३ते ४ तुकड्या म्हणजे जवळपास प्रत्येक इयत्तेत १५० ते १७० मुले शिकत असायची. दुर्दैव असे की आज २१ व्या शतकाची दीड दशकं उलटून गेली तरीही मुंबई पासून फार दूर नसलेल्या आणि मध्य रेल्वेने जोडलेल्या वांगणी येथील शैक्षणिक मागासलेपण आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करणारं आहे. 
सध्या येथे ७ वी मध्ये फक्त २० च विदयार्थी आहेत आणि त्यांनासुद्धा ६ वीच्या विद्यार्थासोबत बसून शिक्षण घ्यावं लागतं आहे. शिक्षणाचा दर्जाचा विचार केला तर ३ ते ४ मधील काही विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव सुद्धा लिहता येत नाही आहे.
हे फक्त एक उदाहरण झाले. कदाचित अशा अनेक शाळा महाराष्ट्रात असतील. प्रश्न असा आहे की मग मराठी कशी वाचेल..फुकट टॅब वाटून कि फुकट बसचा पास देऊन? आज आपल्या मुलांना पालक खाजगी शाळेत लाखो रुपये भरून का घालत आहेत? तो शिक्षणाचा दर्जा आणि सोयी त्यांना पालिकेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषेदेच्या शाळेत का मिळत नाही ? सरकार याचा विचार का करत नाही.
मी ज्या महात्मा गांधी शाळेत ८वी ते १० वी शिकलो, आज त्या शाळेतील माझे अनेक शाळकरी मित्र डॉक्टर किंवा इंजिनियर बनले आहेत. काही मोठ्या हुद्द्यावर आहेत त्याना कधी मराठी मध्ये शिकलो म्हणून कुठे प्रॉब्लेम आला नाही मग आज इच्छा असून सुद्धा पालक मराठी शाळेत टाकत नाहीत त्याचे कारण म्हणजे एकूण असलेली शाळेच्या इमारतीची हालत, तेच जुने आणि खडबडीत बाकडे, मंद प्रकाश, जुनाट आवाज करणारे पंखे, तीच जुनी शिकवण्याची पद्धत आणि बदल शुन्य.
खाजगी शाळेत मिळणाऱ्या सुविधा जर महानगरपालिकेच्या शाळेत मुलाना मिळू लागल्या तर ते एकूण शिक्षण विकासासाठी आणि मराठी भाषेच्या वाढीसाठी खूप उपयोगी पडेल. त्यासाठी सरकार आणि पालक एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे.#अभिजातमराठी#मायमराठी #मराठीदिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: