वीकएंड सुरु झाला कि, मस्त पैकी खावं-प्यावं.. गाढ झोपावं..(झोप पूर्ण शरीराला रिचार्ज करते) ... वाचावं, लिहावं, सुंदर सुंदर बघावं☺☺ कुठे काय चालू आहे ते पाहाव, वाचन, चित्रपट, नाटक, प्रदर्शनं, जत्रा, उत्सव.. बरेच काही चालू असते डोंबिवलीमध्ये वीकेंडला (सध्या साहित्य संमेलन चालू आहे), आपल्या खास मित्रांबरोबर इकडे तिकडे फिरावं..कधी फडके रोडला,कधी गणेश मंदिर, कधी स्वामी समर्थ मठ...तर कधी बच्चे कंपनी सोबत बागेत, मग त्यांच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये... खूप कमी बोलावे आणि खूप खूप ऐकावे आणि सभोवताली चाललेल्या छान छान गोष्टी टिपाव्या... शेवटी दमलात कि शांत पडावे बिछान्यावर .. कसलाही विचार न करता .. कधी करावे? जेव्हा डोंबिवलीच्या बाहेर जात नसाल तेव्हा-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा