रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

स्मार्ट गावे बनवण्यासाठी केलेल्या काही सूचना

स्मार्ट गावे तयार करण्यासाठी पंतप्रधान ऑफिस मध्ये पाठवलेल्या काही सूचना;
१) सर्वात प्रथम तर सावकारी पाश कायमचे बंद करण्यासाठी शेतकरी बँक सुरु करावी आणि शेतीसंबंधी सर्व व्यवहार शेतकऱ्यांनी याच बँकेतून करावे. 
२) मोठे मोठे warehouse प्रत्येक गावागावात उभारावे जिथे शेतकरी आपला माल ठेवू शकतील
३) जिथून शेतकरी आपली उप्त्पादने online विकू शकतील त्यामुळे मधली दलाली बंद होईल. 
४) संपूर्ण दारू बंदी होणे पण आवश्यक आहे.फळापासून होणारे ज्युस व इतर विविध प्रोडूक्टसची विक्री आणि त्याचे मार्केटिंग गावागावात उभारलेल्या warehouse मधून झाले पाहिजे.
५) त्यासाठी प्रत्येक गावागावात रस्ते पोहचले पाहिजे आणि शहर आणि गावा मधील अंतर कमी करता आले पाहिजेत.
६) पाणी वाचवा आणि पाणी जिरवा ही मोहीम जोरदारपणे अवलंबली गेली पाहिजे, त्यासाठी डोंगरमाथ्यावरील झाडांना तोडू न देणे,
७) प्रत्येक घराघरात आणि शेती साठी विहिरी किंवा नदीवरील छोटे छोटे बांध याद्वारे पाणी पोहचेल या साठी प्रयन्त करणे,
८) तिथे पाऊस जास्त पडतो तिथेच फक्त जास्त पाणी लागते अशी पिके घेतली गेली पाहिजे.
९) गावागावात शेतकरण्या शेतीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या शाळा निर्माण झाल्या पाहिजे, शेतीला उद्योग दर्जा देऊन त्याकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे.
१०) जास्तीत तरुण वर्ग शेती कडे करियर म्हणून कसा बघेल या कडे पर्यंत करणे. 

@शैलेश राणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: