सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

आरक्षण आणि बरेचसे प्रश्न

आरक्षण आणि बरेचसे प्रश्न 
आरक्षण देऊन दोन पिढ्या तरी नक्की गेल्या असतील मग त्यांचा किती फायदा लोकांनी घेतला असेल? आणि आपला फायदा झाल्यावर आपल्या जाती मधील लोकांना पुढे यायला कितीशी मदद या लोकांनी केली असेल?जर आरक्षणाचे इतके फायदे मिळाले असतील तर मग आता आरक्षण नको म्हणून ही मंडळी का सांगत नाहीत? आरक्षण असून सुद्धा फायदे जर मिळत नसतील आणि ती मंडळी अजून सुद्धा मागासच असतील तर मग आरक्षण सरसकट रद्द का करू नये आणि दुसरा पर्याय का पाहू नये? त्याचे नेते फक्त गब्बर होताना दिसत आहेत मग त्यांचे पाठीराखे त्यांना जाब का विचारात नाही? मराठा आरक्षण बोलायचे झाले तर ५ कोटीच्या मराठा समाजाला फक्त १६% आरक्षण देणे अन्याय नाही का? मग इतर लोकांनी कुठे जायचे? शिक्षण संस्था आणि साखर कारखाने मराठा नेत्याच्या हातात आहेत आणि मराठा समाजाच्या मागण्या सुद्धा त्यांचं मुद्द्यांना धरून आहेत मग ही मंडळी एकमेकांना भेटून प्रश्न का सोडवत नाही?

देशात जाट, गुज्जर आणि पटेल यांनी सुद्धा आंदोलने केली आणि त्यात दंगल झाले आणि लोक मारली गेली पण गेले काही महिने मराठा समाजाचे आंदोलने शांतपणे सुरु आहे आणि कुठली अप्रिय घटना घडली नाही.या साठी त्याचे नक्कीच कौतुक करायला पाहिजे. पण बाळासाहेब ठाकरे यापासून ते आताच्या राज ठाकरे यांनी केलेल्या मराठी आंदोलनासाठी "तुम्ही संकुचित वृत्तीचे आणि देश तोडणारे" आणि "मुंबई सर्वांची आहे" असे बोलून नाक मुरडणारी लोक जेव्हा जातीसाठी एकत्र आली ते बघून खूप आश्चर्य मात्र नक्की वाटले. त्यावेळी जर मराठी समाज इतक्या मोठ्या पद्दतीने एकटवेला असता तर आज मराठीचे चित्र वेगळे दिसले असते आणि मराठी समाजाचे एक छत्री राज्य असते महाराष्ट्रावर! आणि हो माझा मराठी लाखाचा नाही तर कोटींचा आहे...हो १० कोटींचा आहे हा मराठी!


शैलेश राणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: