बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

मुंब्रादेवीचे दर्शन दसऱ्याच्या दिवशी



'मुंब्रादेवीचे दर्शन दसऱ्याच्या दिवशी' 
नेहमीप्रमाणे चायच्या टपरीवर किशोरला ही कल्पना सुचली आणि ती त्याने नेहमीप्रमाणे त्याच्या लाडक्या संदीपच्या नावावर आपल्या ग्रुप वर टाकली आणि त्याला मित्रांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आज सकाळी सहा वाजता वाजता आम्ही डोंबिवलीकर निघालो आणि मुंब्रावाले मित्र आधीच येऊन दर्शन घेऊन आमच्यासाठी वरतीच थांबले.बाकीच्या मित्रांनी या आधी बऱ्याच वेळा येऊन दर्शन घेतले असले तरी मला मात्र बऱ्याच वर्षांनी हा योग आला होता. इतक्या वर्षात ट्रेन मधूनच देवीला नमस्कार करत होतो.सकाळी सकाळी असे वरती चढून जायला मज्जा येत होती पण नंतर मात्र बरीच दमछाक व्हायला लागली. अधून मधून विश्रान्ती घेऊन मजल-दरमजल चालू होती. धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात आम्ही होतो.वरतून होणारे सूर्यदेवाचे दर्शन,मुंब्राची खाडी,धावणाऱ्या ट्रेन आणि रस्त्यावरच्या गाड्या आणि डोंगरावर आमची मुंब्रादेवीच्या दर्शनासाठी चाललेली वाटचाल हे सर्व आम्हा चाकरमान्यांच्या दैनंदिन आयुष्यतील झलकच दाखवत होते.शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, जे पहिले ते खरोखरच अवर्णनीय होते. मुंब्रा देवी म्हणजे "नव दुर्गा" आहे, नऊ देवींच्या मुर्त्या एकत्र पाहणे खरंच अदभूत वाटत होते.खाली सूर्यकिरणांमुळे सोनेरी रंगात लपटलेल मुंब्रा गाव मस्तच दिसत होते. सूर्य देवाची असंख्य किरणे आजच्या सोनेरी दिवशी जसे काही सोनेरी रंगाची उधळण आम्हा मित्रांवर करत होती. मुंब्रादेवीचे दर्शन घेतले.दर्शन झाल्यावर मित्रांसोबत तिथेच बसून गप्पा गोष्टी सुरु झाल्या. नरेंद्र आणि संजय सुद्धा येत आहे अशी खबर मिळाली आणि त्यात संजयला चक्कर सुद्धा आली होती. शेवटी हे दोघे पण पोहचले आणि दर्शन घेऊन संजयची थोडी गम्मत-मस्ती केल्यावर आम्ही डोंगर उतरायला सुरवात केली. थोड्या अंतरावर सुनीलच्या मित्राच्या वडापावच्या स्टॉलवर तेथील दगडावर झकास जागा शोधून गरमागरम वडापाववर ताव मारला. गेल्या वर्षी व्हाट्सअँपवर प्रॉमिस केल्याप्रमाणे या वर्षी अवॉर्ड function प्रत्यक्ष मित्रांसोबत साजरे कार्याचा मानस केला होता तो संदीपच्या मदतीने सिद्धीस नेला. संदीपने सर्वासाठी अवॉर्ड घेऊन आला होता. नंतर पुन्हा उतरून पायथ्याशी फोटोसेशन,गप्पा आणि चहा पीत नवीन ऊर्जेसह आणि मस्त आठवणी साठवत आनंदाने आम्ही मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: