रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

हिंदी चित्रपट इंडस्ट्री

हिंदी चित्रपट इंडस्ट्री ही नक्कीच साधू संतांची असली पाहिजे.भट साहेबांनी तर मल्लिका शेरावत आणि सनी लियोन यांच्याकडून काम करून अखिल भारतीय जनतेवर जे संस्कर केले आहेत त्याला खरोखर तोड नाही आणि गेली क्रित्येक वर्ष ते सातत्याने लोकांवर चांगले संस्कार करण्याचे काम लाज-लज्जा न ठेवता विनासंकोच करत आहेत. सलमान/संजय दत्त सारखी आदर्श मुले तर आपल्याला सुद्धा हवीत असे भारतातील अनेक आई-बापाना नेहमीच वाटत आलेले आहे.संत दाऊद आणि संत छोटा शकील यांनी भारत देशात केलेल्या थोर कामाची महती समस्त जगाला माहित करून देण्याचे कठीण काम याच हिंदी फिल्म इंडस्ट्रीने केले आहे.शाहरुख खान/अमीर खान सारखे अजिबात गर्व नसलेले,शांत आणि सुशील हिरोना भारतात असुरक्षित वाटत असून सुद्धा फक्त भारतीयांचे मनोरंजन करता यावे म्हणून अजून सुद्धा भारतात राहत आहेत याचे खरे तर कौतुक करायला पाहिजे.गेली क्रित्येक वर्ष इंग्लिश चित्रपट हे सरार्स पणे हिंदी चित्रपटांतील सर्वच गोष्टी कॉपी करत आले आहेत तरी त्यांना माफ करून जो मोठेपणा हिंदी चित्रपट इंडस्ट्रीने दाखवला आहे तसा भू-तलावर अजून कोणी ही अजून दाखवलेला नाही आहे.मी तर म्हणतो काश्मीरचा मुद्धा सुद्धा हिंदी चित्रपट इंडस्ट्रीच सोडवू शकते.हिंदी सिने इंडस्ट्रीने आपले बस्तान मुबईतून उचलून भारत-पाक सीमेवर बसवावे कारण कुणी थोर माणसाने म्हटलेच आहे कि "कलाकारानं सीमा नसते".तिथे राहून त्यांनी रोज तिथे असणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांचे आणि अतिरेक्यांचे मनोरंजन करावे म्हणजे ते युद्ध करणे विसरून जातील आणि तिथे शांतता प्रस्थापित होईल.भारतीय सैनिक सुद्धा शहीद होणार नाहीत.अक्षय कुमार, अनुपम खेर आणि परेश रावल सारखे काही अपवाद असू शकतात म्हणून हिंदी चित्रपट इंडस्ट्री बदनाम होत नाही हे विरोध करणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे.

@शैलेश राणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: