रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

काही मनातले

व्हाट्सअँप आणि फेसबुकचा वापर मी जास्तपणे माझ्या नवीन-जुन्या शाळा-कॉलेज-ऑफिस मधील मित्रांशी संपर्कात राहण्यासाठीच करतो आणि त्यांच्या   सहकार्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष माझ्या स्वतःच्या जीवनात आणि जितके माझ्याकडून होईल इतका समाजात काही बदल घडवून आणता येतील का ते पाहतो किंवा प्रयत्न  करतो.आजच्या घडीला भारतीय सैनिकांच्या मागे उभे राहणे जास्त गरजेचे आहे जे आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या सीमेवर आपले रक्षण करत आहेत आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या देशात रक्षाबंधन जितक्या मोठ्या प्रमाणात साजरे होते आणि ज्या देशात काही ठिकाणी स्वतःच्या मुलीची देवीसारखी पूजा केली जाते त्या देशातील मुलीं ना गर्भात आणि ना गर्भाबाहेर सुरक्षित नाही आहेत.दिल्ली आणि कोपर्डी सारखया घटना ज्या वाचून असे वाटते कि ती माणसेच नसावीत,अगदी क्रूर प्राणी सुद्धा अश्या प्रकारे कुणाशी वागत नाही. खरंच खूप संताप येतो.असे कृत्य करणाऱ्याला तर खरे म्हणजे भर चौकात सर्वांसमोर तडफवून फाशी दिली पाहिजे. अश्या घटनांना जातीची लेबल लावणे तर सर्वात हींन काम आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात तरी अश्या गोष्टी कुणी बोलू नये आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी सर्वानीच हातभार लावला पाहिजे.महाराष्ट्रामधील मराठी हा नेहमीच मातीसाठी लढला म्हणूनच इतिहास घडला नाहीतर तुकड्या तुकड्यात विखरूला असता आणि कधीच इतिहासजमा झाला असता हे ही कुणी विसरू नये. जाती नुसार आरक्षण/गरिबी ही भारताच्या अजूनही जागतिक स्तरावरील पिछाडीचे लक्षण आहे आणि देशाला स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली तर ती आपल्याला दूर करता आले नाही आणि उलट त्यात वाढ करण्याचे काम चालू आहे हीच मोठी शोकांतिका आहे आणि यांचे प्रमाण जितके कमी करून पुढे ती पूर्णपणे नष्ट कशी करता येईल यासाठी सर्वानीच जाती भेद विसरून आणि राजकीय खेळीचा बळी न पडता प्रयत्न केले पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: