रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

मला भेटलेली माणसे -गावंडे सर

लहानपणी सातवीत असताना एका पुस्तकातून कॉपी करून एक निबंध लिहिला होता "माझा आवडता छंद - माणसे जोडण्याचा " त्यावेळी फारसे कळत नव्हते पण माझ्या शिक्षिका म्हणाल्या "तुझा निबंध तू कोठूनतरी कॉपी केला आहेस हे माहित आहे आम्हाला पण तू जो विषय निवडला आहेस छंद म्हणून तो आम्हाला खूप आवडला म्हणून तुला बक्षीस. अशीच चांगली माणसे जोडत जा". तेव्हापासून चांगल्या माणसांना जोडत राहणे आणि त्यांना भेटणे खूप आवडते मला मग ते शाळा किंवा कॉलेज मधील जुने मित्र असो किंवा ऑफिसमध्ये किंवा ऑफिसच्या कामानिमित्त भेटलेली माणसे असो.एवरेस्ट मध्ये काम करताना गावंडे सरांशी ओळख झाली. सेल्स टैक्स विभागात मोठ्या हुद्द्यावर राहून निवृत्त झालेले. वय वर्ष कदाचित ७० वर्षच्या पुढे असेल पण ज्या वयात लोक निवृत्त होऊन आराम करत असतात त्या वयात ते अजूनही तारुण्याच्या जोमाने आणि उत्साहाने सेल्स टैक्स सल्लागार म्हणून एवरेस्ट सारख्या अजून तीन- चार कंपन्या मध्ये ते काम करत आहेत. त्याचे इंग्रजी वरचे प्रभुत्व प्रचंड आहे आणि वाचन सुद्धा तितकेच दांडगे. सल्लागार म्हणून काम करत असले तरी कुणाला कामाशिवाय सल्ला देणे त्यांना आवडत नाही. आपण फक्त चांगले काम करायचे जर आपले काम चांगले असेल तर आपल्याला लोक फॉलो करतील. सतत उपदेश द्यायची गरज नाही.असे त्याचे म्हणणे असते. त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे "कुठलेही काम करताना ते fashion म्हणून करू नका तर passion म्हणून करा".एवरेस्ट मध्ये असताना त्याचा पाय सुजला होता म्हणून त्यांना भेटायला घरी गेलो होतो तेव्हा वाटले ते सल्लागार मधून सुद्धा लवकर निवृत्त होतील पण अजूनही इतक्या वर्षानंतर थोडे काम केले असले तरी अजून सुद्धा त्याचे काम करणे सुरूच आहे. तुम्हाला आदर्श म्हणून नेहमी मोठ्या मोठ्या व्यक्तीकडे बघायला हवे असेच नाही.आपण रोज अनेक माणसे भेटत असतो. काहीजण आपल्याला त्याच्या कामातून प्रेरणा देतात तर काही आपल्या वागण्यातून सकारत्मक विचार पसरवत असतात आपण फक्त डोळे आणि कान उघडे ठेवून ते घ्यायचे… 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: