आज स्वातंत्र मिळून 65 वर्ष होवून गेले. अन्न , वस्त्र, निवारा तर दूरच पण साध्या पाण्यासाठी जनतेला वण वण करावे लागत असेल तर हि लोकशाहीची शोकांतिकाच आहे.गेल्या प्रत्येक निवडणुकीत याचं मुद्द्यावर घोषणा दिल्या जातात.पुन्हा हीच गरीब जनता याचं कॉंग्रेसला आणी राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच निवडून देते मग बोंब मारत बसते.मग आता रडत बसून काय उपयोग.जेव्हा मुबलक पाऊस पडतो तेव्हा तो पाणी धरणे, बंधारे, तलाव बांधून साठवता येत नाही . धरणे, बंधारे, तलाव बांधायच्या नावाखाली 70 हजार करोड रूपयांचा भ्रष्टाचार केला जातो .अति जंगल तोड, डोंगरफोड याने निसर्गाची अतोनात हानी केली जाते.याला जबाबरदार फक्त राजकारणीच नव्हे तर जनता सुद्धा तितकीच जबाबदार आहे.ही लोक पुन्हा पुन्हा अश्या लोकांना निवडून देतात मग अश्या लोकांची कीव तरी का करावी.कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करून सुद्धा पुन्हा याच लोकांच्या मतदानामुळे आमच्या डोक्यावर पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार असेल तर तुमच्या कर्माचे भोग तुम्हीच भोग असेच म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा