गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

जय क्रिकेट स्टार...जय फिल्मस्टार

पुन्हा एकदा भारताने पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला परवानगी दिली..आता पुन्हा पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतात येणार त्याबरोबर पाकिस्तानी नागरिक सुद्धा क्रिकेट सामने पाहण्यासाठी येणार आणि त्यापैकी काहीजण भारताचा राहणार (या आधी सुद्धा हजारो पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानत परत गेलेच नाही आणि अजून त्यांचा शोध लागला नाही,भारत रेशन कार्ड मिळणे किती सोपे आहे ते सर्वांनाच माहित आहे) आणि हीच माणसे भारतात आतंकवाद
 पसरवण्यास मदत करतात.पाकिस्तान मध्ये सुद्धा पैशाचा ओघ येईल आणि तो पैसा पुन्हा भारताविरुद्ध आंतकवादी निर्माण करण्यात खर्च होणार.....भारतामध्ये या मेलेल्या माणसाचे कोणालच काही सोयर सुतक नसते कारण त्यांचा घरातील कोणी मेलेला नसतो (ती वेळ येइ पर्यंत आपण मात्र क्रिकेटचे सामन्याचा आनंद घ्यायचा ..अजून पर्यंत कुठल्याही भारतीय क्रिकेटपटू ने पाकिस्तान बरोबर खेळन्यास नकार दिलेला नाही आहे...मग तो क्रिकेटचा देव असेल किंवा महादेव) कारण या सर्व क्रिकेटपटूचा एकाच देव आहे तो म्हणजे पैसा....भारत हा गुलामाचा देश बनला आहे. जय जवान जय किसान चा नारा विसरून आता जय क्रिकेट स्टार...जय फिल्मस्टार हाच घोष सध्या चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: