दिवसेंदिवस मुंबईतील मराठी टक्का कमी होत आहे . १९६० साली मुंबईत ३९ . ५ टक्के मराठी भाषिक होते . २००१ मध्ये ही टक्केवारी घसरून २७ टक्यांवर आली . २०११च्या जनगणनेनुसार ती २२ टक्के इतकी कमी होण्याची शक्यता आहे . हे कशामुळे घडले हा वादाचा विषय होऊ शकतो .१९९० ते २०१२ पर्यंत याच गिरणगावात गिरण्यांच्या जमिनीवर आकाशाशी स्पर्धा करणारी टॉवर्स संस्कृती फोफावली . परिणामी मूळच्या मराठी भाषिक मुंबईकरांवर वसई - वि
रार - डहाणू , कल्याण , कर्जत कसाऱ्याच्या भागात स्थलांतराची नामुष्की ओढवली.मराठी माणूस जो पर्यंत एकत्र येत नाही आणि आपली भाषा,संस्कृती यांचा सन्मान करीत नाही तो पर्यंत हि पीछेहाट होतच राहणार.मराठी माणसाने फक्त इतराची गुलामी करत बाहेरून आलेल्या लोकांना श्रीमंत केले आणि मराठी उद्योजक मात्र अजून ही मराठी माणसाच्या खेकडा किंवा गांडूळ वृत्ती पुढे स्वताचे अस्तिव टिकवता येत नाही आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा