शुक्रवार, १६ मार्च, २०१२

आता भारत महासत्ता होणार....कारण सचिनचे महाशतक झाले एकदाचे!!!

अखेर होणार होणार म्हणता म्हणता शेवटी सचिनने बांगलादेश विरुद्ध का होईना पण शतकांचे शतक एकदाचे केले (१४७ चेंडूत ११४ धावा म्हणजे किती जलद ते सुद्धा तळाहून नंबर वन असलेल्या.किती ग्रेट ना!!) .बरेच दिवस आज होईल ? उद्या होईल ? परवा होईल ? म्हणता-म्हणता शतकांचे शतक झाले कि हो!!! अवघ्या देशाला सगळ्यात भेडसावणारा यक्षप्रश्‍न होता तो.हे शतकांचे शतक होत नव्हते म्हणून देशासमोरील कितीतरी फालतू प्रश्न सोडवायचे राहून गेले होते.पण आता मात्र चिंता नाही! शतकांचे शतक झाले ! सगळे प्रश्न पटापट सुटतील !भले तो मग काश्मीरचा प्रश्न असो वा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो किंवा देशातील अन्न-अन्न करत रोज एकवेळच्या जेवणासाठी जीवाचा आक्रांत मांडणाऱ्या उपासी पोटांचा प्रश्न असो आणि हो सचिनच्या या महाशतकाच जरा जास्तच आनंद उच्चशिषित एसी मध्ये बसून संगणकावर काम करणाऱ्या क्रिकेटच्या मैदानावरच जन्माला आलेल्या दिवसभर हातात क्रिकेट ब्याट धरून खेळणाऱ्या तरुणांना सुद्धा झाला असेल. आता उसाच्या,कापसाच्या दराचा प्रश्न सुद्धा आता सुटल्यातच जमा आहे.आता कोणताही शेतकरी पाच-दहा हजाराच्या कर्जासाठी आत्महत्या करणार नाही.सगळे कसे आनंदी आनंद !!! आता एवढे सगळे प्रश्न चुटकी सरशी सुटणार म्हटल्यावर तेंडूलकरांच्या सचिनला आता "भारतरत्न" द्यायला काहीच हरकत नाही.बोला.............! सचिन तेंदुलकर देवांचा विजय असो !!!! आता देऊळच बांधा त्यांचे सगळीकडे म्हणजे देवांचे नाव घेऊन लोकांना लुटायला अजून एक देव मिळाला कि आता काही लोकांना. एका महाशयाने तर आता पेट्रोलचे दर वाढवले तरी चालतील असे बोलले आहे.म्हणजे त्याच्या दृष्टीने हे शतक भारतासाठी आणि समस्त भारतीयासाठी किती महत्वाचे होते हे तुम्हाला समजले असेलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: