शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१२

अश्या हिरोंना ओळखा

सैफ अली खान ने परवा एका माणसाला मारले.मागे शाहरुख खानने सुद्धा दारू पिऊन शिरीष कुंदरला मारहाण केली होती,स्टेजवर अश्शील चाळे करण्यात तो माहीर.सलमान ला तर काहीही करायला मोकाट सोडले,मुक्या प्राण्यांना, फुटपाथवर झोपलेल्यांना मारणारा तुरुंगातून सुटून आल्यावर त्यानं हवेत फेकलेला त्याचा बनियन झेलायला तत्पर असलेली, तमाम खानावळीच्या नादी लागणारी, त्यांच्या मागे खुळावलेली ही मंडळी कधी असा विचार करतात का कि हे लोक पैसे फेकले कि लग्नात सुद्धा नाचायला तयार होतात ते खरेच एवढ्या मान देण्याच्या लायकीचे आहेत का? अश्या खानावळीच्या मागे लागलेली तरुण पिढी विचारशक्ती एवढी सडली आहे का? आपण स्वतः काय गमवतो आहोत यांचा विचार करतात काय? विंचूदंशावर उपचार शोधण्यासाठी आयुष्य वेचणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर, डॉ. अभय-राणी बंग, डॉ. आनंद कर्वे यांच्यासारखे संशोधक, आनंदवन उभारणारे डॉ. विकास आमटे, डॉ. चंद्रकांत पोळ, अपंगत्वावर मात करून इतर अपंगांना नवं जीवन देणार्‍या नसिमा हुरजूक, शेतीक्षेत्रात भरीव काम करणारे बी. आर. बारवाले आणि गणपतराव पाटील अश्या अनेकांचा आपण आदर्श कधी घेणार? अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉ. भरत पाटणकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, उल्का महाजान अश्या समाजसेवकांच्या मागे उभे राहून त्यांच्या कार्यात आपण कधी मदत करणार?.२० वर्षात हिवरेबाजारांचा कायापालट करणाऱ्या पोपटराव शिंदेचा आपण डोक्यावर कधी घेणार? विचार बदला आणि अश्या हिरोंना ओळखा.कारण यांचेच विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यात मदत करू शकतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: