आज
२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस तर उद्या २६ जानेवारी प्रजासत्ताक
दिन...या दोन्ही दिवसाचे भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशात खूप महत्व
आहे.पण दुर्देवाने लोकशाहीमध्ये असलेला मतदानाचा मुलभूत हक्कच आपल्या
भारतात ५० % हून जास्त लोक बजावत नाही.पण तीच लोक मग राजकारणाला नाव ठेवतात
, सरकारला शिवीगाळ करतात.पण जर तुम्ही मतदानच करणार नसाल तर तुम्हाला
देशातल्या व्यवस्थेला नावं ठेवण्याचा अधिकार तरी आहे का?.खंर
तर जे ५०% लोक मतदान करत नाहीत त्याचा फटका जे ५०% लोक मतदान करतात
त्यांना होतो.कारण जे मतदान करत नाहीत त्याच्या नावावर बोगस मतदान करून
कुणी दरोडेखोर,खुनी,गावगुंड,अशिषित उमेदवार निवडून येतो.ग्रामीण भागात
जास्त मतदान होण्याचे कारण तर पैसे घेऊन,दारूच्या बाटल्या घेऊन होते.आपण
आपल्याच्या मुलभूत हक्काची पायमल्ली करतो आहोत यांची कुणालाच जाणीव नाही
आहे.त्यामुळेच राजकारणी लोकांचे फावते आहे.मग असे दळभद्री सरकार दर पाच
वर्षांनी तुम्हाला मिळणे हेच तुमच्या नशिबात आहे का? जर नसेल तर त्यासाठी
तुम्ही आतापासून पाऊल उचलून आपला मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवाराला
निवडून देऊन खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक असलेले राष्ट्र बनवण्यासाठी हातभार
लावणार आहात का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा