गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

जरा गर्व बाळगा मराठी असल्याच्या

श्वास हा मराठी सिनेमा आल्यानंतर मराठीत खूप दर्जेदार चित्रपट येत राहिले,पण गल्ला भरू हिंदी सिनेमाच्या गर्दीत मराठी चित्रपटाचा श्वास गुदमरला जात आहेत याची जाणीव मराठी तरुणांना होत नाही ही खरोखरीच शोकांतिका आहे. .ज्या दादासाहेब फाळकेमुळे सिनेमा बनवण्याचा उद्योग देशाला मिळाला त्यांच्याच आयुष्यावर बनलेला "हरिश्चंद्राची फॅक्टरी" तिकीट खिडकीवर आर्थिक गणिते जुळवू शकला नाही.गल्लाभरू हिंदी सिनेमाला गर्दी करताना आपण आपल्या मराठी चित्रपटना.... पर्यायाने आपल्या मराठीला कमी लेखतो आहे असे कुणालाच का वाटत नाही? आपण आपल्या मराठी कलाकारांना कधी डोक्यावर घेणार.? आपल्याच महाराष्ट्रात अजून सुद्धा मराठी चित्रपटासाठी आंदोलने करावी लागतात.? हिंदी सिनेमाचे २०-२४ शो मल्टीप्लेक्ष मध्ये चालू असताना मराठी चित्रपट फक्त १-२ शो पुरते च असतात याची मराठी लोकांना जरा सुद्धा शरम का वाटत नाही.?आपण देवळात गेल्यावर काही रुपये दान करत असतो कारण आपला धर्म वाढवा म्हणून....तीच गोष्ट मराठी धर्माची... त्यासाठी आपल्या मराठी भाषेचा प्रचार होणे खूप गरजचे आहे.चित्रपट,नाटक संगीत,पुस्तके ही काही माध्यमे....जरा गर्व बाळगा मराठी असल्याच्या.आपल्या मराठीचे धिंडवडे निघत असताना शांत बसू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: