अण्णा
आम्हाला माफ करा....दिल्लीकरांनी ज्या प्रकारे तुम्हाला प्रचंड पाठिंबा
दिला त्या प्रकारे तुमच्याच महाराष्ट्रात तुम्हाला पाठिंबा देवू शकलो
नाही.शिवाजी महाराजांचे आदर्श सोडा आम्ही त्याचे मावळेही होऊ शकलो नाही.
गुलामगिरीची,किड्या मुंग्यासारखे जगायची इतकी सवय झाली आहे आम्हाला कि
आम्ही आमच्या पिढी साठी काय ठेवून जाणार यांची ही आम्हाला पर्वा नाही.आमची
मने मेली आहेत.फेसबुकवर मी अण्णा हजारे बोलत तुमचे चित्र प्रोफाईलवर
वापरणारे आम्ही, आता इंग्रजाच्या सण साजरे करण्यात गर्क आहोत.३१ डिसेंबर
कुठे जायचे यांचे कार्यक्रम आखण्यात गर्क आहोत.आम्ही तर आमची संस्कृतीच
विसरलो आहोत.मी भला आणि माझे जीवन भले इतके आम्ही स्वार्थी झालो आहोत.
अण्णा आम्हाला माफ करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा