बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

संस्कृती टिकवाल तर ती टिकेल

यांना फक्त 'खळ्ळ खटाक'चा आवाज चांगला समजतो.प्रेमाने सांगितले तर समजत नाही. काल पासून काही मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवायला सुरवात झाली आहे.हे फक्त मनसे ने आंदोलन केल्या नंतर झाले हे विशेष. पण या मुळे आपण लडाई जिंकलो असा होत नाही.निव्वळ ऑफिसमध्ये किवा घरी बसून मराठीच्या मुद्यावर गप्पा मारून स्वतः मात्र काही न करता मराठीला त्याचा काही फायदा होणार नाही आहे.


हे चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पहिले पाहिजेत तरच या आंदोलना काही अर्थ प्राप्त होईल नाहीतर त्यांना परत "मराठी चित्रपट पाह्यला कोणी येतच नाही तर आम्ही ते का लावावे" असे ओरडत बसतील. एकटेच नाही तर आपल्या परिवारासकट किंवा मित्रांना बरोबर घेऊन चित्रपट पाह्यला जा.जर तुम्हीच काही करणार नसाल तर इतरना दोष देण्यात काय अर्थ.अरे जरा गर्व बाळगा...मराठी असल्याचा! आणि ती टिकवण्यासाठी आपण स्वतः प्रयन्त करा. इतरची वाट कशाला बघता!

संस्कृती टिकली तर धर्म टिकेल .....धर्म टिकला तर मराठी टिकेल .....आणि मराठी टिकली तरच महाराष्ट्र टिकेल .....!!! जय महाराष्ट्र ......!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: