सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

खरंच लाज वाटते का मराठी माणसाला मराठी असल्याची?

खरंच लाज वाटते का मराठी माणसाला मराठी असल्याची?




आपल्याच राज्यात मराठीचा आदर व्हावा म्हणून आंदोलन करावी लागतात.मग तो Radio FM वर मराठी गाणी लावण्याचा असो वा मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावण्यासाठीचे आंदोलन असो.बेळगाव मध्ये मराठी लोकावर होणार अत्याचार असू दे...मराठी लोक स्वत: एकत्र येत नाही.श्रीलंकेत तमिळ लोकावर अत्याचार होत आहेत म्हणून तामिळनाडूचे सरकार भारत सरकार वर दबाव आणते कारण तामिळनाडू मध्ये असलेला लोकांचा पाठिंबा.तिथे सर्व पक्षांना एकत्र यावे लागते या प्रश्नावर कारण तिथे असलेला लोकांचा दबाव.शिवसेना कधी मराठी साठी आंदोलन करते तर कधी मनसे पण हवा असा त्यांना कधी पाठिंबा मिळालाच नाही.१९६६ पासून मराठी साठी शिवसेना लढत होती पण त्यांना सत्तेवर येण्साठी १९९५ ची वाट बघावी लागली.ते सुधा त्यांनी हिंदुत्वाचा सहारा घेतला तेव्हा.अखेर त्यांना आपला पक्ष चालाव्याचा असतो उद्या फारसा मराठी लोकांचा पाठिंबा मिळाला नाही तर मनसे सुद्धा तेच करेल.



आज मराठी मुंबईतून हद्दपार झालीच आहे.उद्या इतर शहरातून ती होइल.संपूर्ण महाराष्ट्राची अशी अवस्था होऊ नये.मित्रानो मराठीचा वापर जितका जास्तीत जास्त होईल तितका करा.इंग्रजी जरूर शिका प्रगतीसाठी पण मराठीला विसरू नका.आज ही अनेक मराठी माणसे भेटल्यावर प्रथम हिंदीत

सुरवात करतात. आपल्याच राज्यात परक्यासारखे जगायला आपण आलो आहोत का.आपले अपयश दुसर्यावर ढकलून आपण मोठे होणार नाही.आपली भाषा समृद्ध होण्यासाठी आपण स्वत: ही जबाबदारी उचलायला हवी.१९६६ पासून शिवसेना काहीतरी करेल म्हणून वाट बघत बसलात आता की मनसे काही तरी करेल म्हणून वाट बघत बसणार आहात का तुम्ही.?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: