सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

संसदेच्या कॅन्टीन जे भाव बघा....

जरा तुम्ही कल्पना करा शाकाहारी जेवणाची थाळी फक्त रुपये १२.५०/- किवा दालची वाटी फक्त रुपये १.५०/- आणि चपाती फक्त १ रुपयाला एक आणि हे सर्व जेव्हा जेव्हा अन्नधान्यचे भाव गगनाला भिडले आहेत?


हो, हे होऊ सकते,भारतातील गरिबांना जिथे एका वेळचे अन्न मिळणे कठीण झाले असले तरी संसदेच्या कॅन्टीन मध्ये मात्र एकाहून एक अश्या लज्जतदार डिशेस एकदम स्वस्तात मिळतील.

जे खासदार संसदेत एकमेकावर ओरडत असतात आणि जे विरोधक सरकार वर वाढलेल्या महागाई वर टीका करत असतात, ते नक्कीच असे स्वस्तात मिळणारे खाणे आनदाने खात असतील.हे असे स्वस्तातले जेवण फक्त खासदार नाही, तर संसदेत काम करणारे कर्मचारी,सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार सुधा लाभ घेतात, दाल जी आधी पर्यत गरिबाचे अन्न म्हणून ओळखली जायची ती आता इतकी महाग झाली आहे पण या कॅन्टीन मध्ये मात्र १.५० रुपयात तुम्हाला एक वाटी दाल मिळेल

पेट्रोल-डीजल चे भाव मात्र वेळो वेळी वाढवणाऱ्या या सरकारने हे भाव मात्र कधी २००४ नंतर कधीच वाढवले नाहीत

जरा खाली दिलेले कॅन्टीन जे भाव बघा....



चहा - रुपया १/-

सूप- rupaye ५.५०/-

दाल (एक वाटी) -rupaya १.५०/-

शाकाहारी थाळी-(दाल,भाजी,४ चपाती,भात किवा पुलाव,दही आणि सालाड) रुपये १२.५०/-

मासांहारी थाळी-रुपये २२/-

दही भात-रुपये ११/-

वेज पुलाव-रुपये ८/-

चिकन बिर्याणी-रुपये-३४/-

फिश करी आणि भात-रुपये १३/-

राजमा भात-रुपये ७/-

फिश करी-रुपये १७/-

चिकन करी-रुपये २०.५०/-

चिकन मसाला- रुपये २४.५०/-

बटर चिकन-रुपये २७/-

१ चपाती-रुपया १/-

भात -रुपया २/-

डोसा-रुपया ४/-

खीर एक वाटी-रुपये५.५०/-

फळाचा केक-रुपये ९.५०/-

फळाचे सालाड-रुपये ७/-

मित्रानो एकमेकाविरुद्ध भांडणे आता बंद करा,त्याचावर अंधळा विश्वास आता करू नका.ते सर्वजण सुखाने जगात आहेत.त्रास फक्त होतो आहे तो गरिबांना आणि सामान्य माणसाला.एवढे स्वस्त जेवण मिळवत असल्यामुळेच त्यांना लोकसभेत गोंधळ घालता येतो.जागे व्हा!.आता पाउल उचले तरच उद्या चांगले बदल दिसतील.

1 टिप्पणी:

THANTHANPAL म्हणाले...

संसदेच्या कॅन्टीन जे भाव बघा....आवो चोरो लुटो सारा! आधा तुम्हारा आधा हमारा असे सध्या चालले आहे. हे फक्त माझा देश महान चा नारा लावणाऱ्या माझ्या भारत देशातच घडू शकते. उद्या हे दारू,आणि नंबर दोनच्या कामा करताही सरकार कडून भत्ता वसूल करतील. आपल्या कडे शोध पत्रकारिता हा प्रकारच बंद झाला आहे, किंवा गांधी छाप चिकट पट्टीने त्यांचे तोंड चिटकवले गेले असेल