रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

विनंती विशेष-२

माननीय राष्ट्रपती,




माझ्या आधीच्या प्रत्राचे उत्तर काही मिळाले नाही..असो.पुन्हा पत्र लिहिण्यास कारण कि खेळामध्ये असलेला राजकारणी लोकाचा सहभाग.

सध्या राष्ट्रकुल खेळामुळे सुरेश कलमाडी यांचे नाव सर्वच channel वर आणि पेपर मध्ये दिसते आहे.ज्या माणसाने कधी क्रिकेट ची फळी कधी उचलली नाही ते शरद पवार आज क्रिकेट चे आतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत.कुणी खेळाडू का नाही?.ते भारतीय अध्यक्ष सुद्धा होते.कृषिमंत्री असताना त्याचाच महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत असतात त्याने हे वेगळे पद का घायव्से वाटले?.



गरीब लोकांना पुरेल इतका गहू आज पाण्याखाली सडून जात आहे.आणि हे काही न लाज ठेवता सांगतात कि हे दर वर्षीच होते मग त्याचा इतका बाऊ का आता करता आहात.इतकी वर्ष हे खाते त्याचा कडेच होते मग अजून त्यावर काहीच उपाय योजना का नाही झाली.कि त्याचे लक्ष फक्त क्रिकेट मधील निवडणुकामध्ये होते.आता आतरराष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी प्रतप्रधानाडे विनंती केली माझा कामाचा बोजा कमी करावा. एवढेच जर त्याचाकडे काम होते तर त्यांनी क्रिकेट कडे का लक्ष दिले?.लालू प्रसाद यादवांनी सांगितल्या प्रमाणे हा गहू मुदाम सडून तो बियर बनवण्यासाठी वापरला जातो का?



त्याचा कामावर लक्ष तरी आहे का?.सुषमा स्वराज महागाई वर भाषण करत असताना ते हसत होते हे सर्वांनी पहिले आहेच.विरोधी पक्ष त्यावर त्यांना विचारात असतानाही त्याचे हसणे कमी झले नाही.इथे लोकांना जेवणाचे हाल होत असताना याचे जेवण बराच वेळ सुरु होते.त्यांना नंतर लोकसभेत यावसे वाटले नाही.



हे सर्व कधी पर्यत आम्ही सहन करायचे.?



एक त्रस्त भारतीय नागरिक



शैलेश राणे

1 टिप्पणी:

THANTHANPAL म्हणाले...

भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का? हा लेख मी शनिवारी mr . upakram वर लिहिला आणि आज आपला राष्ट्रपतीचा लेख मिळाला. यांचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळा. मी अनेक वेळा सरकारला भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करा, त्यांची सर्व मालमत्ता जप्त करा. म्हणून मागणी केली. पण असा कायदा केला तर ९० % राजकारणी जेल मध्ये जातील अशी सरकारला खात्री असल्यामुळे सरकार हा कायदा करत नसावी . आपण राष्ट्रपतीला जे पत्र लिहिले तसेच पत्र सर्व न्याय्धीशाना पण पाठवता येईल
याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दखल करता सुद्धा येये. आपल्या सारख्या ब्लॉगर्स चे सहकार्य मिळाले तर हे काम सहज शक्य होईल. PLEAS REPLY
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com