शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

......कारण मुंबई सर्वाची

मुंबई सर्वाची....

गुरा ढोरा सारखा ट्रेन मधून प्रवास कर तू....... कारण मुंबई सर्वाची.

रोज सकाळी लढाईला निघाल्यासारखा निघ तू ......कारण मुंबई सर्वाची

कसे करून लोकल डब्ब्यात घुसायचे आहे..... कारण मुंबई सर्वाची

नाही मिळाले तर अपंग किंवा माल डब्ब्यात सुद्धा घुसू...... कारण मुंबई सर्वाची

जरा धक्का लागला तर काढू करू त्याच्या संपूर्ण घराण्याचा उद्धार....कारण मुंबई सर्वाची

डोके रोज तापत जाते आहे प्रसंगी गळा सुद्धा पकडला जातो आहे....कारण मुंबई सर्वाची.

रोज लोंढे आदळत आहेत... जिथे जागा मिळेल तिथे जात आहेत...कारण मुंबई सर्वाची.

रेल्वेच्या जाग्या बळकावल्या गेल्या कारण मुंबई सर्वाची..

आता फुटपाथ सुद्धा बळकावू...कारण मुंबई सर्वाची.

समुद्रात सुद्धा भर घालती जात आहे....कारण मुंबई सर्वाची.

सचिन,लता,अंबानी अलिशान गाड्यातून फिरतात आणि आम्हाला सांगतात मुंबई सर्वाची.

पेडर रोड समोर ब्रिज झाला तर आम्ही दुबईला जाऊ म्हणतात आणि आम्हाला राष्ट्रीय एकतात्मेतेचे धडे देतात...कारण मुंबई सर्वाची.

जिथे चांगली जागा दिसेल तिथे घाण करून.तोंडातून पिचकारी मारून जागा लाल करू...कारण मुंबई सर्वाची.

रिक्षावाल्याची मुजोरी वाढली....कारण मुंबई सर्वाची.

रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ते ...कारण मुंबई सर्वाची.

चाळ तोडून टावर झाले...मराठी माणूस बाहेर फेकला गेला...कारण मुंबई सर्वाची.

कुणी मराठी माणसा बद्दल बोलले कि झाले त्याचे राजकारण...सतत आम्हाला सांगितले जाते मुंबई सर्वाची.

अजूनही मराठी साठी आंदोलन करावे लागते...कारण मुंबई सर्वाची.

कोणी ही येतो सर्व समोर लोकांना गोळ्या घालतो आणि आम्ही त्याला फुकट मध्ये पोसतो....कारण मुंबई सर्वाची.

अधून मधून येथे बॉम्बस्फोट होत असतात...माणसे मारतात...कारण मुंबई सर्वाची.

गृह मंत्री म्हणतात अश्या छोट्या गोष्टी मोठ्या शहरामध्ये होत असतात....कारण मुंबई सर्वाची.

मराठी माणसाच्या हक्काबद्दल बोलणे येथे पाप आहे.... कारण मुंबई सर्वाची.

तोंड दाबून मराठी माणसाला बुक्क्याचा मार ....कारण मुंबई सर्वाची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: