रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

'मराठी भाषा दिन'

मराठीवर ठाम विश्वास प्रकट करणारे ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हा दिवस आपण 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करतो. काल पासून त्या बद्दल मेल येत आहेत. माझा एक मित्र मला यावरून एकदा बोलला होता " आपण रोज आईला मान देतो, रोज कुणा कुणावर तरी प्रेम करत असतो आणि रोजच मराठी मध्ये बोलतो तर त्यांचे दिवस कशाला साजरे करायला हवे.करायचे असतील ते हिंदी किंवा इतर भाषेचे दिन महाराष्ट्रात साजरे करावे" त्याचा एक मुद्धा जरी बरोबर असला तर दिन जेव्हा साजरे होत असतात तेव्हा त्याबद्दल बरेच उहाफोह होत असतात.मराठीचे बाळकडू पिऊनच आपण मोठे होतो. मराठी भाषेला समृद्ध वारसा आहे.आपल्या मराठी भाषेला १३०० वर्षाची परंपरा आहे,९ कोटी बोलणारे लोक आहेत,देशात ४थ्या स्थानावर तर जगात १५व्या स्थानावर आहोत.तरी सुद्धा आज मराठी साठी आंदोलने करावी लागत आहेत हे खूपच खेदाची गोष्ट आहे.आजच्या मराठीमध्ये सर्रासपणे हिंदी, इंग्रजी शब्द येतात. ती आजची बोलीभाषा बनली आहे.मराठी माणसाला जर स्वताची भाषा टिकवता येत नसेल तर त्याचा दोष बाहेरून आलेल्या लोकांना का द्यायचा.मराठी चित्रपट आणि मराठी नाटके चालत नाही यांचा दोष कुणाचा. आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आपण स्वतः काही करत नसू तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे.हि भाषा वाढावी आणि तिचा प्रसार व्हावा यासाठी प्रयन्त तर करायला पाहिजे पण त्याचबरोबर इतरांना सल्ले देण्यापेक्षा आपण स्वतः मराठीसाठी काय करतो हे हि तपासून पहिले पाहिजे.मराठीचे संवर्धन हे केवळ बोलण्यापुरते राहू नये. मराठी गाणी, पुस्तके यातून आपणच तिचे संगोपन केले पाहिजे. बदलत्या काळानुसार व्यवहार इंग्रजीतून होणे अनिवार्य आहे. मात्र इतर कुठलीही भाषा ही मातृभाषेची जागा घेऊ शकत नाही. संस्कृती परंपरा ही नव्या पिढीत नेण्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आज तमिळ भाषा तिथल्या लोकांची रोजच्या दैनदिन जीवनात आग्रही धरली म्हणून आज तिथे कामासाठी जाणाऱ्या माणसाला ती शिकावी लागते नाहीतर त्यांचे काम होणारच नाही.तमिळ माणूस आपल्या मातृभाषेविषयी जसा कडवा असतो, तसाच कडवेपणा आपण मराठीबाबत जपला पाहिजे तरच आपली भाषा अधिक लोकापर्यंत पोचू शकेल आणि ती टिकेल.भाषा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांवर आहे. मराठीची उंची एवढी मोठी करूया की इतरांना माना वर करून तिच्याकडे पाहावे लागेल.



माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा तिच्या संगे जागतील दऱ्याखोऱ्यातील शिळा...

1 टिप्पणी:

घरची बाग म्हणाले...

jase english shikayche classes astat tar mag marathi shikayche classes ka kon suru karat nahi dusrya deshat kinva rajyat.