मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

विनंती विशेष

मी आतापर्यंत आमच्या नगरसेवकालाहि प्रत लिहिलं नाही आहे.पण का कौन जाने तूम्ह्लाला प्रत लिहावसे वाटले.




जेव्हा तुमची राष्ट्रपती म्हणून निवड झाली तेव्हा किती आनद झाला होता.एकतर प्रथमच महिला राष्ट्रपती आणि ती सुधा मराठी.



पण आज मी खूप निराश होऊन हे प्रत मी तुम्हला लिहित आहे.मुंबई किवा महाराष्ट्र बाहेर आम्ही गेलो नाही.त्यामुळे त्याचाबद्दल आम्ही फक्त वाचूनच आहोत.एकीकडे भारत आणि पाकिस्तानचा सीमाप्रश्न तर एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरु आहे.चंद्राबाबूने सुधा हैदराबाद आणि महाराष्ट्र वादात उडी मारून घेतली होती. १९६० साली आम्ही जन्माला आलो नव्हतो त्यामुळे त्यावेळी सयुकत महाराष्ट्राचे आंदोलन करून मिळवला मंगल कलश कशा मिळाला हे माहित नाही.पण त्यात १०६ हुत्मात्ने झाले हे आम्हाला माहित आहे.आज बेळगावात राहणाऱ्या मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे.तुम्हाला त्याविषयी काहीच वाटत नाही का?



आज मुंबईची वाटच लागली आहे.प्रचंड प्रमाणात येणाऱ्या लोन्द्यामुळे मुलुभूत सुविधाच मिळणे मुश्कील झले आहे.पाणी टंचाई,विजेचा प्रश्न,जागेच भाव तर गगनाला भिडलं आहेत.एका फुटाची किमत आज लाखात आहे.हे गरिबांना परवडणार कस.सरकारने तर मुंबईच विकायला काढली आहे

जागोजागी रस्त्यावर खड्डे आहेत.फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे.अगदी रेल्वेचा फूट ब्रिजवरहि.



आज मलेरियाने सर्वच मुंबईकरांना ग्रासले आहे. हॉस्पिटलमध्ये तर इतकी गर्दी असते कि इलाज होणार कधी? आज ट्रेन मधून किवा बसून प्रवास करणे म्हणजे जवळ जवळ नरक यातनाच.मागे आपले युवराज राहुल गांधीने प्रवास केला तो सुधा फिरस्त क्लास ने ते सुधा फारशी गर्दी नसताना सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात.त्यांनी जरा सकाळी ८-.३० ते ११ किवा ५-८ मध्ये प्रवास करावा.आज बस मधला प्रवास म्हणजे सहनसाक्तीची सीमाच.ऑफिसमध्ये जाताना २ तास परत ९ तास काम करून येताना २ तास.मध्यम वर्गी लोकांचा संपूर्ण वेळ असाच जातो ते family ला कधी वेळ देणार.



मान्य करतो कि देशात कोणीही कुठेहि जाऊन राहू सकतो पण जे आधीपासून राहतात त्यांना त्रास होऊ नये इतकी तरी काळजी घावी कि नाही.उत्तरप्रदेश किवा बिहार मधल्या नेत्यांना आमचे प्रश्न समजणार नाही. म्हणून तूम्ह्ला ते सांगत आहोत.



आम्ही इतके मोठे नाही आहोत पण महाराष्ट्रात राहणर्या कॉमन man ला की त्रास होत आहे ते संग्साठी तुम्हाला प्रत लिहिले



काही चूक असल्यास शमा असावी



तुमचा एक त्रस्त भारतीय नागरिक