बुधवार, २८ डिसेंबर, २०११

अण्णा आम्हाला माफ करा...

अण्णा आम्हाला माफ करा....दिल्लीकरांनी ज्या प्रकारे तुम्हाला प्रचंड पाठिंबा दिला त्या प्रकारे तुमच्याच महाराष्ट्रात तुम्हाला पाठिंबा देवू शकलो नाही.शिवाजी महाराजांचे आदर्श सोडा आम्ही त्याचे मावळेही होऊ शकलो नाही. गुलामगिरीची,किड्या मुंग्यासारखे जगायची इतकी सवय झाली आहे आम्हाला कि आम्ही आमच्या पिढी साठी काय ठेवून जाणार यांची ही आम्हाला पर्वा नाही.आमची मने मेली आहेत.फेसबुकवर मी अण्णा हजारे बोलत तुमचे चित्र प्रोफाईलवर वापरणारे आम्ही, आता इंग्रजाच्या सण साजरे करण्यात गर्क आहोत.३१ डिसेंबर कुठे जायचे यांचे कार्यक्रम आखण्यात गर्क आहोत.आम्ही तर आमची संस्कृतीच विसरलो आहोत.मी भला आणि माझे जीवन भले इतके आम्ही स्वार्थी झालो आहोत. अण्णा आम्हाला माफ करा...

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

खरंच खूप विचित्र आहेत भारतामधील लोक...

खरंच खूप विचित्र आहेत भारतामधील लोक...
५ वर्ष ज्या सरकारच्या नावाने शिव्या देतात त्याच सरकारला मग बाटली,पैसे घेऊन परत निवडून देतात...
देव सगळीकडे आहे म्हणतात आणि देवळापुढे प्रचंड रांगा लावतात...
साईबाबा स्वतः फकिरासारखे जगले त्यांना सोन्याचा मुकुट,सिंहासन अपर्ण करतात
राजकारणाच्या आचरणावर वर गप्पा मारतात आणि जिथे जागा मिळेल तिथे पचा पचा थुंकून जागा लाल करतात.
पाकिस्तानी लोकांचा तिटकारा करतात पण त्याच पाकिस्तानी कलाकाराचे चित्रपट,टीवी मालिका डोक्यावर घेतात.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला यांची देशभक्ती जागी होते मात्र बाकीचे दिवस अमेरिकेमध्ये किंवा युरोप मध्ये नोकरी कशी मिळेल यांचा विचार करतात.
फक्त घरच्या मैदानावर वाघ आणि परदेशात शेळीसारखी अवस्था करून घेणारे क्रिकेट पटू साठी भारतरत्न ची मागणी होते पण ज्या समाज सेवकांनी आपले सपूर्ण जीवन समाजसेवे साठी घालवले त्या प्रकाश- मंदा आमटे, अभय- राणी बंग यांचा मात्र विसरतात..
शेतकरी/कामगार यांचे प्रश्न मांडण्या ऐवजी इथली मिडिया ऐश्वर्या रायच्या गरोदर होणाच्या,खान बंधूच्या माकड चाळाच्या कौतक सोहळे दाखवत बसतात.