गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

अण्णा काय चुकीचे मागत आहेत ???

जरा बघूया अण्णा असे काय मागता आहेत ज्यासाठी सरकारला एवढा वेळ लागतो!


1) प्रत्येक राज्यात लोकायुक्त असावा,

2) राज्यामधील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लोकपालाच्या खाली येतील

3) लोकाची काम किती दिवसात झाली पाहिजे?? प्रत्येक कामाची एक वेळ नक्की व्हावी !! उदाहरण- रेशनकार्ड, लायसन्स, जन्म मृत्य प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र या साठी लोकांना किती वेळ लागेल ते नक्की व्हावे,जर लागणारे सर्व कागदपत्रे दिलेली असतील तर,मग ८/१५/३० दिवसात कामे झाली पाहिजेत !! आता यामध्ये अण्णा काय चुकीचे मागत आहेत ??? स्वतःसाठी अण्णा काही मागत आहेत का ?? 

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

........आता माझी सटकलीय


अण्णा म्हणाले " उपोषण सुरु करणार...आताच्या आता l लोकपाल बिल पास करून घेणार...आताच्या आता l भ्रष्टाचार संपवणार...आताच्या आता l सर्व राजकारण्यांना सरळ करणार...आताच्या आताl " माझ्या गरजा कमी आहेत ... म्हणून माझ्यात हिंमत आहे" ........आता माझी सटकलीय... सरकारच्या आईच्या गावात"

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

अण्णा हजारे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम...














किती विचित्र आहे ना हा माणूस.....


कुठे बस जाळली गेली नाही,

कुठे रेल्वे बंद केली गेली नाही,

जबरदस्ती दुकाने बंद केली गेली नाही,

कामगाराची चूल पण बंद होऊ दिली नाही,

चक्का जाम झाल्यामुळे महिलेला रस्तावर मुलाला जन्म द्यावा लागला अशीही कुठे बातमी नाही,

तरी सुद्धा काय जबदस्त आग लावली संपूर्ण भारतामध्ये....

एक विश्वास जागवला...जिथे काही घडणार नाही तिथे काही तरी घडू शकते असे आता लोकांना वाटते आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.ही परिवर्तनाची नांदी ठरो

हा विश्वास,ही आशा,ही आग विझू देऊ नका.....हे तर छोटेसे पाउल होते...

अण्णा हजारे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम...