सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

ना भारत, ना इंग्लंड... खेळ जिंकला!

कालचा भारत आणि इंग्लंड मधील क्रिकेट सामना बघतील्यावर "अप्रतिम" हाच एकच शब्द वर्णन करण्यासाठी आतातरी मनात येत आहे.एक भारतीय म्हणून निश्चित वाईट वाटत आहे कि ३०० च्या वर धावा करून सुद्धा आपण जिंकू शकत नाही.एक हाती सामना जिंकून देणारा एकही गोलंदाज आपल्याकडे नाही तरी सुद्धा एक सच्चा क्रिकेट रसिक मात्र कालच्या सामन्याबद्दल नक्की म्हणेल कि काल कोणी जिंकले नसेल पण क्रिकेट नक्की जिंकला.अटीतटीचा सामना म्हणजे काय याचा शब्दश: थरारक अनुभव जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी नक्कीच घेतला असणार.तो थरार नक्कीच विश्वचषक स्पर्धेत प्राण आणणारा असेल.सचिन ने पुन्हा एकदा शतक ठोकले, काय बोलणार या माणसापुढे! एखाद्याची कमिटमेंट काय असते, ते याच्याकडे बघून कळतं. छे, याच्याबद्दल काही बोलणं व्यर्थ आहे. तो ग्रेट आहे, एवढंच म्हणून त्याचा खेळ बघायचा. सचिन तेंडुलकर या नावातच काहीतरी जादू आहे. तो खेळतो तेव्हा सगळा देश थांबतो.पण पुन्हा एकदा गोलदाजनी त्यांच्या शतकावर पाणी फिरवले.338 धावा करून जर आपण जिंकू शकत नाही तर आपली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय लायकीचं आहे हे समजते.तरी सुद्धा भारत यावेळी विश्वचषक जिंकेल असा वेडा आशावाद आपण ठेवायचा.किती सामने आपण असे फलदाजीच्या जोरावर जिकणार? ज्या बांगलादेशने आपल्या विरुद्ध २८३ धावा केल्या होत्या त्या बांगलादेशाला आयर्लंडने २०५ धावात गुंडाळले होते.जाऊ होते असे कधी कधी.धोनी काही तरी कमाल करेल आणि भारत या सामन्यामधून काहीतरी शिकेल आणि पुढे आपला खेळ उंचावेल अशीच आशा करूया.


सध्या फिरत असलेला हा खालील मेल सुद्धा वाचा

एक लडकी थी, दिवानी सी...

सचिन पे वो मरती थी...

चोरी चोरी, चुपके चुपके हरभजन को चिठ्ठीयाँ लिखा करती थी...

नजरे झुका के, शरमा के, गंभीर से बाते करती थी...

कभी कभी झुल्फे बिखेरके, सेहवाग की गलियो मे गुजरा करती थी...

कुछ कहना था शायद उसको रैना से, पर धोनी से वोह डरती थी...

जब भी मिलती थी युवराज से, बस यही पुँछा करती थी की,...

की,......

की,.....

कमीनों, वर्ल्ड कप कब जितोगे??

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

'मराठी भाषा दिन'

मराठीवर ठाम विश्वास प्रकट करणारे ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हा दिवस आपण 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करतो. काल पासून त्या बद्दल मेल येत आहेत. माझा एक मित्र मला यावरून एकदा बोलला होता " आपण रोज आईला मान देतो, रोज कुणा कुणावर तरी प्रेम करत असतो आणि रोजच मराठी मध्ये बोलतो तर त्यांचे दिवस कशाला साजरे करायला हवे.करायचे असतील ते हिंदी किंवा इतर भाषेचे दिन महाराष्ट्रात साजरे करावे" त्याचा एक मुद्धा जरी बरोबर असला तर दिन जेव्हा साजरे होत असतात तेव्हा त्याबद्दल बरेच उहाफोह होत असतात.मराठीचे बाळकडू पिऊनच आपण मोठे होतो. मराठी भाषेला समृद्ध वारसा आहे.आपल्या मराठी भाषेला १३०० वर्षाची परंपरा आहे,९ कोटी बोलणारे लोक आहेत,देशात ४थ्या स्थानावर तर जगात १५व्या स्थानावर आहोत.तरी सुद्धा आज मराठी साठी आंदोलने करावी लागत आहेत हे खूपच खेदाची गोष्ट आहे.आजच्या मराठीमध्ये सर्रासपणे हिंदी, इंग्रजी शब्द येतात. ती आजची बोलीभाषा बनली आहे.मराठी माणसाला जर स्वताची भाषा टिकवता येत नसेल तर त्याचा दोष बाहेरून आलेल्या लोकांना का द्यायचा.मराठी चित्रपट आणि मराठी नाटके चालत नाही यांचा दोष कुणाचा. आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आपण स्वतः काही करत नसू तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे.हि भाषा वाढावी आणि तिचा प्रसार व्हावा यासाठी प्रयन्त तर करायला पाहिजे पण त्याचबरोबर इतरांना सल्ले देण्यापेक्षा आपण स्वतः मराठीसाठी काय करतो हे हि तपासून पहिले पाहिजे.मराठीचे संवर्धन हे केवळ बोलण्यापुरते राहू नये. मराठी गाणी, पुस्तके यातून आपणच तिचे संगोपन केले पाहिजे. बदलत्या काळानुसार व्यवहार इंग्रजीतून होणे अनिवार्य आहे. मात्र इतर कुठलीही भाषा ही मातृभाषेची जागा घेऊ शकत नाही. संस्कृती परंपरा ही नव्या पिढीत नेण्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आज तमिळ भाषा तिथल्या लोकांची रोजच्या दैनदिन जीवनात आग्रही धरली म्हणून आज तिथे कामासाठी जाणाऱ्या माणसाला ती शिकावी लागते नाहीतर त्यांचे काम होणारच नाही.तमिळ माणूस आपल्या मातृभाषेविषयी जसा कडवा असतो, तसाच कडवेपणा आपण मराठीबाबत जपला पाहिजे तरच आपली भाषा अधिक लोकापर्यंत पोचू शकेल आणि ती टिकेल.भाषा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांवर आहे. मराठीची उंची एवढी मोठी करूया की इतरांना माना वर करून तिच्याकडे पाहावे लागेल.



माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा तिच्या संगे जागतील दऱ्याखोऱ्यातील शिळा...