रविवार, ७ मे, २०१७

चारोळी

) व्हाट्सअप वर तो तिच्याशी,
तासंनतास बोलत बसतो,
पण ती समोर आली की,
तो शब्दच हरवून बसतो.


) कधी काळी मी पण 
प्रेमाच्या सागरात अंखड बुडालो होतो,
पण पाणी एवढे थंड होते की
लगेच बाहेर आलो होतो




३) ऊन जरा जास्त आहे,
असं दरवर्षी वाटतं.
एसी मध्ये बसल्यावर मग,
गारगार वाटतं


एकटा असला की तो, 
पुस्तक चाळत बसतो,
पुस्तकाच्या दुनियेत मग,
तो स्वतःला हरवून बसतो

समजून घ्यावे भाव त्याचे,
असे त्याला कधी वाटत नाही.
मनातले शब्द ओठावर आणणे,
तसे त्याला कधी जमत नाही.


😜

तो आणि ती

तो:एक सांगू का तुला?
ती:हा बोल ना...
तो:तू खूप गोड हसतेस.😘
ती:😊मी पण एक सांगू?
तो: हो..सांग ना😇
ती: मी अशी फक्त तू समोर असतोस तेव्हाच हसते😊
#ती_आणि_तो

तो आणि ती

शनिवारच्या रम्य संध्याकाळी फडके रोड वर हातात हात घालून फिरताना;
तो : हा गरुत्वाकर्षणाचा नियम नाही प्रिये, मी जरी चंद्रावर असतो ना तरी तुझ्या प्रेमात पडलो असतो;
हे सांगत असताना समोरून येणाऱ्या सुंदर युवतीला पाहून तो धडपडला, तिने मात्र त्याचा हात घट्ट पकडल्यामुळे त्याचा तोल गेला नाही. 
ती : आता काळजी नसावी प्रियकरा , आता मी आहे ना सोबत.आता पडू नाही देणार तुला. 
असे बोलून तिने त्याचा हात अजून घट्ट दाबला आणि तो काय समजायचं ते समजला. 
#ती_आणि_तो

तो आणि ती

एअरटेल गॅलरी समोर रुसलेली ती... 
ती : तुझं ना माझ्यावर अजिबात प्रेमच नाही... 
तो: अगं.. असं कसं म्हणतेस तू, माझ्या प्रेमाबद्दल काय सांगू तुला 
ती : काय सांगतोस तुझ्या प्रेमाबद्दल 
तो : जियोच्या जमान्यात सुद्धा आधी वोडाफोन मग आयडिया आणि आता एअरटेल वापरतोय पण जिओच्या नादी नाही लागलो मी 
ती : हीहीही... तू पण ना... कसं सुचत रे तुला रे असं पटकन
तो : हीहीही... खरं म्हणजे तू समोर असलीस कि काहीच सुचत नाही मला
ती: काहीही... हा
तो : अगं खरंच.
#तो_आणि_ती

ती आणि तो

संध्याकाळी साडेआठ ची वेळ असते , तो ऑफिस मधून थकुन भागून घरी येतो . टिवीवर त्याच सासू सुनेच्या रडक्या सिरियल चालू असतात.आई आणि बायको मात्र एकाग्रतेने सिरीयल बघत असतात,तो सुद्धा आवरून त्याच्या बरोबर बसतो,"ही ना अशीच" "ती ना तशीच" अश्या आई आणि बायकोच्या अधून मधून कॉमेंट चालू असतात. हे ऐकून तो ही उस्कुतेनेे सिरियल बघत बसतो , पण त्याला काही कळत नाही,बायको जाहिरातीच्या ब्रेक मध्ये त्याला जेवायला देते,टीव्ही वर पुन्हा दुसरी सिरीयल सुरु होते, त्याला ती आधीच्या सिरीयल सारखीच वाटते.त्याच्या डोक्यावरील आठ्या पाहून बायको हळूच हसते. तो जेवून उठतो आणि मोबाईल घेतो आणि फेसबुक उघडून बसतो. तितक्यात फेसबुक मेसेजरची घंटी किंणकिंणते
ती:- हाय , कसे आहात
तो : मजेत
ती: हम्म
ती: जेवण झाले का?
तो:हो
ती: हम्म्म
तो लगेच लॉग आऊट होतो, झोपी जातो पण डोक्यात मात्र " हंम्मा हंम्मा " चे गाणे वाजत राहते.

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

मराठी शाळा

८० च्या दशकात जेव्हा मी मराठी शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा एका वर्गात ४० ते ५० मुले असायची आणि एका इयत्तेच्या ३ते ४ तुकड्या म्हणजे जवळपास प्रत्येक इयत्तेत १५० ते १७० मुले शिकत असायची. दुर्दैव असे की आज २१ व्या शतकाची दीड दशकं उलटून गेली तरीही मुंबई पासून फार दूर नसलेल्या आणि मध्य रेल्वेने जोडलेल्या वांगणी येथील शैक्षणिक मागासलेपण आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करणारं आहे. 
सध्या येथे ७ वी मध्ये फक्त २० च विदयार्थी आहेत आणि त्यांनासुद्धा ६ वीच्या विद्यार्थासोबत बसून शिक्षण घ्यावं लागतं आहे. शिक्षणाचा दर्जाचा विचार केला तर ३ ते ४ मधील काही विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव सुद्धा लिहता येत नाही आहे.
हे फक्त एक उदाहरण झाले. कदाचित अशा अनेक शाळा महाराष्ट्रात असतील. प्रश्न असा आहे की मग मराठी कशी वाचेल..फुकट टॅब वाटून कि फुकट बसचा पास देऊन? आज आपल्या मुलांना पालक खाजगी शाळेत लाखो रुपये भरून का घालत आहेत? तो शिक्षणाचा दर्जा आणि सोयी त्यांना पालिकेच्या शाळेत किंवा जिल्हा परिषेदेच्या शाळेत का मिळत नाही ? सरकार याचा विचार का करत नाही.
मी ज्या महात्मा गांधी शाळेत ८वी ते १० वी शिकलो, आज त्या शाळेतील माझे अनेक शाळकरी मित्र डॉक्टर किंवा इंजिनियर बनले आहेत. काही मोठ्या हुद्द्यावर आहेत त्याना कधी मराठी मध्ये शिकलो म्हणून कुठे प्रॉब्लेम आला नाही मग आज इच्छा असून सुद्धा पालक मराठी शाळेत टाकत नाहीत त्याचे कारण म्हणजे एकूण असलेली शाळेच्या इमारतीची हालत, तेच जुने आणि खडबडीत बाकडे, मंद प्रकाश, जुनाट आवाज करणारे पंखे, तीच जुनी शिकवण्याची पद्धत आणि बदल शुन्य.
खाजगी शाळेत मिळणाऱ्या सुविधा जर महानगरपालिकेच्या शाळेत मुलाना मिळू लागल्या तर ते एकूण शिक्षण विकासासाठी आणि मराठी भाषेच्या वाढीसाठी खूप उपयोगी पडेल. त्यासाठी सरकार आणि पालक एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे.#अभिजातमराठी#मायमराठी #मराठीदिवस

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

अभिजात मराठी

दोन एक दिवसापूर्वी म.टा. मध्ये बातमी वाचली कि कल्याणचे आचार्य अत्रे नाट्यगृह बंद होऊन तिथे मॉल होणार आहे. अश्या प्रकारे नाट्यगृहे बंद करण्याऐवजी महाराष्ट्रातील अशी सर्वच नाट्यगृह मराठी सांस्कृतिक केंद्रे कशी बनतील यासाठी प्रयन्त केले पाहिजे.जर असे झाले तर तुम्हाला मराठी चित्रपट, मराठी नाटक आणि मराठी संगीताचे कार्यक्रम अश्या एका ठिकाणी पाहायला मिळू शकतील. तिघांसाठी (नाटक/सिनेमा/वाद्यवृंद) स्वतंत्र छोटेखानी तीन थिएटर्स असतील. रसिकांना एकाच वेळी मनोरंजनाचे तीन पर्याय उपलब्ध असतील.ज्यांना मराठी संगीताची आवड आहे,त्यांना संगीताच्या सिडीज विकत घेता येईल अशी जागा तिथे असेल. ज्यांना मराठी पुस्तकाची आवड आहे, त्याच्यासाठी नवीन जुनी मराठी पुस्तके वाचायला आणि विकत घ्यायला दर्जेदार वाचनालय सुद्धा तिथे असेल. दर शनिवार/रविवार आणि सुट्टीच्या दिवशी छोटी छोटी नाटुकली संध्याकाळी त्या परिसरात सादर होतील आणि फिरायला येणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाईल. खऱ्या अर्थाने मराठीला अभिजात दर्जा मिळून देण्यासाठी सरकारने तसेच मराठी जनतेने मिळून अश्या प्रकारे प्रयन्त केले पाहिजे.#मराठीदिन #मायमराठी #अभिजातमराठी